जगात अवघ्या 25 कुटुंबांकडे 358 अब्ज डॉलरची संपत्ती, ब्लूमबर्गकडून सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर

ब्लूमबर्गने जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची लेटेस्ट यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, जगातील टॉप 25 श्रीमंत कुटुंबांकडे 358 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती आहे. यांची एकूण संपत्ती 2.9 लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. श्रीमंत कुटुंबांच्या यादीत केवळ 8 कुटुंबांकडे 100 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती आहे. 8 कुटुंबांपैकी एक कुटुंब हे हिंदुस्थानातील अंबानी कुटुंब आहे. या यादीत ते 8 व्या स्थानी आहे.

द वॉल्ट्न्स ः या यादीत हे कुटुंब पहिल्या स्थानावर आहे. या कुटुंबाची वॉलमार्टमध्ये मोठी भागीदारी आहे. या कुटुंबाकडे 513 अब्ज डॉलर संपत्ती आहे. अल नयन फॅमिली ः अबूधाबी येथील या कुटुंबाकडे संयुक्त अरब अमीरात (यूएई) चे खूप सारे तेल गोदामे आहेत. यांच्याकडे 335.9 अब्ज डॉलर संपत्ती आहे. अल सौद ः सौदी अरबचे शाही कुटुंबाकडे 213.6 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. या कुटुंबाकडे सैदी अरामको आहे. अल थानी ः कतारचे शासक कुटुंब अल थानी 1940 पासून श्रीमंत आहेत. या कुटुंबाकडे 199.5 अब्ज डॉलर संपत्ती आहे. हर्म्स कुटुंब ः हर्म्स कुटुंबाने सहा पिढीपासून संपत्ती सांभाळून ठेवली आहे. या कुटुंबाकडे 184.5 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. कोच कुटुंब ः कोच कुटुंबाकडे 150.5 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मार्स कुटुंब ः स्निकर्ससारख्या ब्रँड्ससाठी प्रसिद्ध असलेले मार्स कुटुंब सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 143.4 अब्ज डॉलर आहे. अंबानी कुटुंब ः हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाकडे 105.6 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

Comments are closed.