कोकाटे प्रचार करत होते, आता रुग्णालयात कसे? अंबादास दानवे यांचा सवाल

1995 मधील शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने अडचणीत आलेले अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ते आता रुग्णालयात आहेत. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. कोकाटे प्रचार करत होते, तर आता अचानक रुग्णालयात कसे गेले? असा सवाल त्यांनी केला आहे.

आरोपींना ज्या ररुग्णालयात ठेवण्यात येते, तेथेच कोकाटे यांना ठेवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. इतरांना साधे औषधोपचारही मिळत नाही, तर कोकोटे यांना व्हीआयपी सुविधा का पुरवतात? असा सवालही त्यांनी केला आहे. कोकाटे नगरपालिका निवडणुकीसाठी गावागावत प्रचार करत होते, ते आताच रुग्णालयात कसे आहेत? त्यांचा जो काही आजार असेल त्यातून ते बरे व्हावे, अशी आपली इच्छा आहे. मात्र, आरोपींना ज्या रुग्णालयात ठेवण्यात येते, तेथे ठेवण्याऐवजी कोकाटे यांना व्हीआयपी सुविधा असलेल्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना सर्व सोयीसुविधा का मिळत आहेत? असे सवाल दानवे यांनी केले आहेत.

आम्ही संविधान, घटनेसाठी संघर्ष करत आहोत, ते याचसाठी आहे. इतर आरोपींना जेवण, औषधोपचारही मिळत नाही आणि कोकाटे यांना व्हीआपी सुविधा पुरवण्यात येत आहेत. आरोपींना ज्या रुग्णालयात ठेवण्यात येते, तेथेच कोकाटे यांना ठेवावे, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.

Comments are closed.