Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश – प्रज्ञा सातव

हिंगोली: काँग्रेसच्या दिवंगत नेत्याची आणि माजी खासदार राजीव सातव यांची राजकीय वारसदार अशी ओळख असलेल्या प्रज्ञा सातव यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आज त्या प्रथमच हिंगोलीत दाखल झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी स्वागत
हिंगोलीत आगमन झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुटकुळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपमधील या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विकासासाठी घेतला निर्णय
पक्षप्रवेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, “स्व. राजीव सातव यांनी हिंगोलीच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, ते दुर्दैवाने अपूर्ण राहिले. ते विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.” केवळ जिल्ह्याचा विकास आणि जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद

Comments are closed.