रूम नंबर 105 ऐवजी 205 मध्ये एंन्ट्री; बियर पाजून सामूहिक अत्याचार अन्… एका फोन नंबरमुळे सापडल

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये तीन नराधमांनी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार (Chhatrapati Sambhajinagar Crime News) केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेनं परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हि घटना हॉटेल परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Police) पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली.

Chhatrapati Sambhajinagar Crime : नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी हॉटेलच्या 105 रूममध्ये ती थांबली होती. दरम्यान तिला फोन आल्याने ती काही वेळासाठी बाहेर गेली. मात्र परत हॉटेलच्या रूममध्ये परताना ती चुकून रूम नंबर 105 ऐवजी 205 मध्ये गेली. यावेळी त्या रूममध्ये तीन तरुण दारू पीत होते. यावेळी या तिघांनी मिळून तरुणीला दारू पाजली आणि तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला, असा तरुणीचा आरोप आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणाची छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दखल घेतली असून तपासी अधिकारी प्रवीण यादव हे या गुन्हाचा अधिक तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाजगी रुग्णालयात काम करणारी पीडित महिला (30) ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी या संतापजनक प्रकार घडला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime :  जबरदस्तीने बिअर पाजली, सामूहिक अत्याचार केला

आरोपींनी तरूणीला जबरदस्तीने बिअर पाजली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान ती त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि पळून गेली. पीडितेने ताबडतोब वेदांतनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड यांना अटक केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : एका क्रमांकावर आवळल्या तिघांच्या मुसक्या

तर मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी मित्र असून ते फायनान्स कंपनीसाठी रिकव्हरीचे काम करतात. बुधवारी रात्री त्यांनी हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी रूम बुक केली होती. यादरम्यान त्यांनी एकाचा नंबर दिला होता. पोलिसांनी त्या क्रमांकावरून तिघांच्या मुसक्या आवळल्या.

Chhatrapati Sambhajinagar Crime : खोली क्रमांक १०५ ऐवजी २०५ मध्ये

पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक १०५ मध्ये थांबले होते. मित्र झोपल्यानंतर तरुणी थोडा फोनवरती बोलत खोलीबाहेर आली होती. परत खोलीत जाताना मात्र तिने १०५ ऐवजी चुकून खोली क्रमांक २०५ मध्ये प्रवेश केला. त्या खोलीत आरोपी ऋषिकेश, घनश्याम व किरण दारूचे पीत होते. आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात आल्याने तरुणी तत्काळ खोलीबाहेर गेली. मात्र, एकाने बाहेर येत पुन्हा तिला खोलीत नेत बळजबरीने बिअर पाजली. यात तरुणीची शुद्ध हरपत गेली व तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हॉटेलमधून पलायन केले.

आणखी वाचा

Comments are closed.