कॉमेडी क्वीन Bharti Singh दुसऱ्यांनी बनली आई, घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांच्या घरात दुसऱ्यांदा चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. भारतीने 19 डिसेंबरला सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारतीचा पहिला मुलगा ‘गोला’च्या जन्मानंतर आता पुन्हा एकदा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असून संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अद्याप भारती किंवा हर्षने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.

भारती आणि हर्षने काही महिन्यांपूर्वीच अतिशय खास शैलीत चाहत्यांना दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यानंतर भारतीच्या चाहत्यांना या आनंदाच्या क्षणाची मोठी उत्सुकता होती. दरंम्यान आाता भारती दुसऱ्यांना आई झाल्याची आनंदाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंडिया टुडेने याबाबत माहिती दिली आहे.

टेली टॉकच्या रिपोर्टनुसार, ‘गोला’ उर्फ लक्ष्यला आता छोटा भाऊ मिळाला आहे. यापूर्वी 2022 मध्ये भारतीने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. गोला आधीच सोशल मीडियावर प्रसिद्ध असून त्याच्या क्युटनेसवर चाहते फिदा असतात. आता त्याच्या धाकट्या भावाच्या आगमनाने हर्ष आणि भारतीचा आनंद द्विगुणित झाला आहे. दरम्यान, भारतीने अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती, परंतु दुसऱ्यांदा मुलाचे स्वागत करतानाही हे कपल तितकेच आनंदी आहे.

Comments are closed.