Hangxiety: ख्रिसमस- न्यू इयरला दारूचा प्लॅन करताय? Hangxietyचा असतो धोका; ९९% लोकांना नाही माहित
ख्रिसमस आणि न्यू इयर आता अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पार्टीचं नियोजन केलं जात असेल. या काळात बहुतेक पार्ट्यांमध्ये लोक मर्यादेपेक्षा जास्त दारू पितात. पण तुम्हाला माहिती आहे का दारू पिल्यानंतर हँगक्झीटीचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. बऱ्याच जणांना या शब्दाचा नेमका अर्थही माहित नसेल. ( What is Hangxiety And How Does It Affcets Body )
हँगक्झीटी म्हणजे काय?
हँगक्झीटी ही चिंता आणि मानसिक तणावाची स्थिती आहे जी अल्कोहोल पिल्यानंतर उद्भवते, परिणामी हँगओव्हरची लक्षणे आणि चिंता निर्माण होतात. जेव्हा मेंदूमध्ये GABA आणि ग्लूटामेट सारख्या न्यूरोट्रांसमीटरचे असंतुलन असते तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. कारण हे हार्मोन्स मूड नियंत्रित करण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी महत्त्वाचे असतात. हँगक्झीटीच्या स्थितीमध्ये वाढलेली चिंता, जलद हृदयाचे ठोके, चिडचिड, डोकेदुखी, थकवा, नकारात्मक विचार आणि पश्चात्तापाची भावना यांचा समावेश होतो.
डिहायड्रेशनही चिंतेचा विषय
अल्कोहोल हे लघवीचे प्रमाण वाढवणारे पेय आहे. यामुळं शरीराला निर्जलीकरण होऊ शकतं. यामुळे थकवा, चिडचिड आणि मूड स्विंग होऊ शकते आणि झोपेची गुणवत्ताही बिघडते.
हेही वाचा: Alcohol Fact : दारू प्यायल्यानंतर किती वेळ शरीरात राहतो हँगओव्हर
हँगक्झीटीला प्रतिबंध करणे महत्त्वाचं
सर्वप्रथम, अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा आणि आवश्यकतेपेक्षा जास्त पिऊ नका. अल्कोहोल पिताना हायड्रेशनची काळजी घ्या; दारू पिण्यापूर्वी आणि नंतर पाणी पिण्याची खात्री करा. याशिवाय सकस स्नॅक्स आणि अन्न योग्य प्रमाणात खा, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषण मिळेल. योग्य झोप घ्या आणि शरीराला विश्रांतीसाठी वेळ द्या. हे उपाय हँगक्झीटीची लक्षणे कमी करू शकतात.
Disclaimer: हा लेख फक्त माहिती देण्यासाठी असून Mymahanagar.com आणि Only मानिनीचा मद्यपानाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही. ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Comments are closed.