ट्रेविस हेडचं एडिलेडमध्ये ऐतिहासिक शतक! डॉन ब्रॅडमन यांच्या खास विक्रमाशी साधली बरोबरी
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर ट्रेविस हेडने (Travis Head) एडिलेड कसोटीत ऐतिहासिक शतक झळकावून खळबळ माजवून दिली आहे. त्याने मैदानाच्या चहूकडे चौकार-षटकारांची आतषबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. हेडच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
ट्रेविस हेडसाठी हे शतक अत्यंत खास ठरले आहे. एडिलेडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सलग चार कसोटी सामन्यांत शतक झळकावणारा तो क्रिकेट इतिहासातील केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी केवळ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने हा पराक्रम केला होता. या कामगिरीमुळे हेडचे नाव आता ‘सर डॉन ब्रॅडमन’ यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियात एकाच मैदानावर सलग 4 शतके ठोकणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.
एकाच मैदानावर सलग 4 शतके ठोकणारे फलंदाज:
डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया मेलबर्न 1928–1932
वॉली हॅमंड इंग्लंड सिडनी 1928–1936
मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलिया ॲडलेड 2012-2014
स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया मेलबर्न 2014–2017
ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलिया ॲडलेड 2022-2025
गेल्या चार वर्षांपासून एडिलेडच्या मैदानावर ट्रेविस हेडची बॅट तळपत आहे. त्याने या मैदानावर खेळल्या गेलेल्या गेल्या चारही सामन्यात शतके पूर्ण केली आहेत:
2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक, 2024 मध्ये दोन वेगवेगळ्या सामन्यांत दोन शतके पूर्ण केली आहेत आणि आता 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध देखील त्याने ऐतिहासिक शतक झळकावले आहे.
सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेत ट्रेविस हेड जबरदस्त फॉर्मात असून तो आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे जिथे कठीण मानले जाते, तिथे हेडने ही जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे.
Comments are closed.