विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ जाहीर, विराट कोहली खेळणार, तर ऋषभ पंत करणार संघाचं नेतृत्व

विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hajare trophy) पहिल्या दोन सामन्यांसाठी DDCA दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आपला संघ जाहीर केला आहे. या संघाबाबतची सर्वात मोठी बातमी म्हणजे विराट कोहली (Virat Kohli & Rishbh Pant) आणि ऋषभ पंत या स्पर्धेत खेळणार आहेत.

ऋषभ पंत(Rishbh Pant) दिल्ली संघाचा कर्णधार असेल, तर आयुष बडोनी उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. विराट कोहली, इशांत शर्मा आणि नवदीप सैनी यांनी खेळण्यासाठी आपली उपलब्धता स्पष्ट केली आहे. हर्षित राणा उपलब्ध असल्यास तो संघात सामील होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

विजय हजारे ट्रॉफी 24 डिसेंबरपासून सुरू होत असून दिल्लीचा पहिला सामना 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश विरुद्ध तर 26 डिसेंबर रोजी विरुद्ध गुजरात सोबत होणार आहे.

दिल्लीचा संघ एलिट ‘डी’ ग्रुपमध्ये असून त्यांच्यासोबत हरियाणा, ओडिशा, रेल्वे, सौराष्ट्र आणि सर्व्हिसेस यांसारखे संघ आहेत.

विराट कोहली तब्बल 15 वर्षांनंतर म्हणजेच 2010 नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने शेवटचा सामना सर्व्हिसेसविरुद्ध खेळला होता. विराटने कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती घेतली असल्याने तो आता फक्त वनडे फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत विराटने 3 सामन्यांत 302 धावा (2 शतके, 1 अर्धशतक) करत आपला जबरदस्त फॉर्म सिद्ध केला आहे.

दिल्लीचा पहिल्या 2 सामन्यांसाठीचा स्क्वाड:
आयुष बडोनी, अर्पित राणा, यश धुल्ल, सार्थक रंजन, प्रियांश आर्य, तेजस्वी सिंग, नितीश राणा, हृतिक शौकीन, हर्ष त्यागी, सिमरजीत सिंग, प्रिन्स यादव, दिविज मेहरा, आयुष डोसेजा, वैभव कंदपाल, रोहन राणा आणि अनुज रावत.

Comments are closed.