IND vs SA: हार्दिक-तिलकच्या शानदार खेळीने दक्षिण आफ्रिका पराभूत! भारताचा 3-1 ने मालिका विजय!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 19 डिसेंबर रोजी पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 30 धावांनी विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात टाकली.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. संजू सॅमसन (Sanju Samson and Abhishek Sharma) (37) आणि अभिषेक शर्मा (34) यांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची वेगवान भागीदारी केली.

तर, तिलक वर्माने (Tilak Verma) 10 चौकार आणि 1 षटकारासह 42 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. हार्दिक पंड्याने (Hardik pandya) भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि एकूण 25 चेंडूत 63 धावा केल्या.

232 धावांच्या महाकाय लक्षाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. क्विंटन डी कॉकने 35 चेंडूत 65 धावा करत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. डेवाल्ड ब्रेविसने 31 आणि डेव्हिड मिलरने 18 धावा केल्या, पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. शेवटी दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावांपर्यंतच पोहोचू शकला.

वरुण चक्रवर्ती आयसीसीच्या या नंबर 1 गोलंदाजाने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत 4 विकेट्स घेतल्या.
जसप्रीत बुमराह: बुमराहने अचूक गोलंदाजी करत २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने 2 विकेट्स घेतल्या, पण त्याने 3 षटकांमध्ये 44 धावा दिल्या.

Comments are closed.