अंबरनाथ, बारामतीसह 24 नगर परिषदांसाठी आज मतदान

निवडणूक आयोगाला स्थगित कराव्या लागलेल्या अंबरनाथ, बारामतीसह राज्यातील 24 नगर पालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. याशिवाय 76 नगर पालिका, नगर पंचायतींमधील नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठीही आज   मतदान होईल.

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. त्यानुसार राज्यातील 24 ठिकाणी आज मतदान होत आहे.

मतदान होत असलेल्या नगर पालिका आणि  नगर पंचायती

अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी आणि  नेवासा, बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची,  अनगर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री,  मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अंजनगाव सुर्जी,  बाळापूर, यवतमाळ, वाशीम, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस.

उद्या निकाल

या निवडणुकीची तसेच 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 264 नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी 10 पासून सुरू होईल.

Comments are closed.