आज बीसीसीआयच्या कॅबिनेटमध्ये वर्ल्ड कप संघाचा फैसला; फॉर्म की नाव पाहून संघ निवडणार याकडे सर्वांचे लक्ष
हिंदुस्थानच्या टी-20 संघाची निवड आज बीसीसीआयच्या कॅबिनेटमध्ये (निवड समिती) पुन्हा एकदा फॉर्म नव्हे, तर फाईल बघून होणार असल्याची दाट शक्यता आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर करताना निवड समितीने फॉर्म, फिटनेस आणि सध्याची कामगिरी या तीन शब्दांना जणू विश्रांतीवर पाठवल्याचे कळले आहे. अशा स्थितीत टी-20 चे जगज्जेतेपद राखण्यासाठी निवड समिती 15 सदस्यीय खेळाडूंची निवड कशी करते, याकडे अवघ्या हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे.
संघ निवडीवेळी आकडे बाजूला ठेवून ‘क्लास कायम असतो’ हा जुना मंत्र पुन्हा एकदा वापरला जाऊ शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादव यंदा फलंदाज म्हणून अपयशी ठरला आहे, हे आकडय़ांवरून नव्हे तर डोळय़ांनीही दिसते. तरीही संघाचे नेतृत्व त्याच्याकडे अबाधित आहे. कारण निवड समितीला प्रश्न विचारण्यापेक्षा ‘हा तोच सूर्यकुमार आहे’ असे स्वतःला समजावणे अधिक सोयीचे वाटते. शुभमन गिलची स्थितीही फार वेगळी नाही. चांगली सुरुवात करून विकेट देण्याची सवय जणू त्याची ओळख बनली आहे. तरीही तो ‘भविष्यातील स्टार’ म्हणून दरवेळी वाचतो. यावेळीही त्याला वाचवण्याचीच शक्यता आहे.
फलंदाजीत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि ईशान किशनसारखे खेळाडू आकडय़ांच्या जोरावर दार उघडत आहेत. पण निवड समितीला आकडय़ांपेक्षा नावांची भीती अधिक आहे. झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणाऱया यष्टिरक्षक ईशानचा वाईट काळ संपल्याचे उद्या निवड समिती जाहीर करील. आता या झंझावाताला संघाबाहेर ठेवणे निवड समितीला शक्य नाही. तसेच संजू सॅमसनचे नशीब अजूनही दुर्दैवी आहे की नाही, याचा फैसलाही करायचा आहे. मात्र रिंकू सिंहसारखा सामना जिंकून देणारा फलंदाज अजूनही ‘योजनेत आहे का नाही’ या फाईलमध्येच अडकलेला आहे. त्याची निवड होईल की नाही, हे सांगता येत नाही. तरी 15 सदस्यीय संघ निवडताना बीसीसीआयला आकडे आणि नाव या दोघांचे संतुलन साधत कुणावर अन्याय होणार नाही, असा संघ निवडावा लागणार आहे.
गोलंदाजीबाबत तर स्थिती अधिकच धक्कादायक आहे. जसप्रीत बुमरावर संपूर्ण भार टाकून उर्वरित गोलंदाजांकडे केवळ ‘त्याचा साथीदार’ म्हणून पाहिले जातेय. अर्शदीप सिंगची सातत्याने विकेट घेण्याची क्षमता, हर्षित राणाची आक्रमकता किंवा युवा गोलंदाजांची भूक याकडे निवड समिती गांभीर्याने यंदा पाहील, अशी माफक अपेक्षा आहे.
अष्टपैलूंमध्ये हार्दिक पंडय़ा अजूनही ‘नावावर निवडला जाणारा’ खेळाडू असला तरी आता तो आपला खेळ दाखवतोय. त्यामुळे तो संघात असेलच. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत सातत्य दाखवले आहे, पण त्यांच्याकडे नेहमीच दुय्यम पर्याय म्हणून पाहिले जाते. टी-20 क्रिकेटमध्ये सामना जिंकण्यासाठी 6-7 पर्यायांची गरज असते, याची जाणीव यंदा तरी निवड समितीला होईल आणि त्या दृष्टीने अंतिम 15 सदस्यीय संघ निवडला जाईल.
हिंदुस्थानचा संभाव्य १५ सदस्यत्व चहा-20 संघ
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्नाधर), हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, इशान किशन/जितेश शर्मा (यशिष्टरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद कुमार सिंह, हर्षित कुमार सिंधू, रेड्डी, आर.
Comments are closed.