मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीने नितीश कुमार यांना धमकी दिली आहे.
हिजाब वादावरून संताप व्यक्त : पोलिसात तक्रारही दाखल
मंडळ संस्था/श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धमकी दिली आहे. ‘तुम्हाला आमच्या बुरखा किंवा हिजाबला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. पुन्हा तुम्ही आमच्या हिजाबला स्पर्श कराल तेव्हा आम्ही मुस्लीम महिला तुम्हाला असा धडा शिकवू की तुम्ही तो कधीही विसरणार नाही, असा इशारा इल्तिजा यांनी नितीशकुमार यांना दिला आहे. तसेच नितीशकुमार यांनी आपल्या कृतीबद्दल माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंबंधी इल्तिजा यांनी कोठीबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत बिहारच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे तथापि, पोलिसांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
Comments are closed.