ईडीची भीती दाखवून वृद्ध महिलेकडून पैसे उकळले

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ची भीती दाखवून ठगाने वृद्ध महिलेच्या खात्यातून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. मनी लाँडरिंग कायद्यानुसार अटकेची कारवाई करण्यात येत असल्याची भीती दाखवली. फसवणूक प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार या वृद्ध महिला आहेत. चार दिवसांपूर्वी त्या घरी असताना त्याना एका नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलवर बोलणाऱयाने तो ईडीमधून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर तो पह्न कविता नावाच्या महिलेकडे ट्रान्सफर केला. चर्चेदरम्यान त्या महिलेने तक्रारदार याना तुमच्या बँक खात्यात 2 कोटी रुपये इतक्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत. त्या रकमेचा वापर दहशतवादी फंडिंग म्हणून होत आहे. त्यामुळे ईडीने तुमच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याचे महिलेला सांगण्यात आले. महिलेला विश्वास बसावा म्हणून त्याने ईडीचे असिस्टंट डायरेक्टरचे नाव आणि सही असलेली नोटीस, सर्वोच्च न्यायालय याच्या पत्रावर टेरर फंडिंग नमूद केलेले पत्र पाठवले. ठगाने महिलेला काही पत्र व्हॉट्सअपला पाठवून ईडीने डिजिटल अटक केल्याचे महिलेला सांगण्यात आले.

त्यानंतर कविता नावाच्या महिलेने तक्रारदार याच्या बँक खात्याची माहिती घेतली. जर अटक टाळायची असल्यास 4 लाख 96 हजार रुपये भरावे लागतील असे त्याना सांगण्यात आले. त्या घरी एकटय़ाच असल्याने त्याने याची माहिती कोणालाही सांगितली नाही. अटकेच्या भीतीपोटी त्याने पैसे देण्यास होकार दर्शवला होता.

Comments are closed.