गिलच्या सांगण्यावरून सूर्यकुमार यादवने ‘या’ खेळाडूकडे ट्रॉफी सोपवली; 31 वर्षीय खेळाडूही झाला थक्क; VIDEO

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2025चा शेवट दणक्यात केला. अहमदाबाद येथे झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. टीम इंडियामध्ये मालिका विजयानंतर संघातील सर्वात तरुण खेळाडू किंवा मालिकेत पदार्पण करणाऱ्या नवीन खेळाडूला ट्रॉफी देण्याची प्रथा आहे. तथापि, यावेळी गिलच्या विनंतीवरून सूर्यकुमार यादवने 31 वर्षीय खेळाडूला ट्रॉफी दिली. त्याला ट्रॉफी देताना खेळाडूलाही आश्चर्य वाटले. बीसीसीआयने या खास क्षणाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.

सामना सादरीकरणानंतर सूर्यकुमार यादव ट्रॉफी घेऊन संघाकडे जात असताना, विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ट्रॉफी कोणाला द्यावी याबद्दल तो गोंधळला. शुभमन गिलने त्याला शाहबाज अहमदला ट्रॉफी देण्याचा सल्ला दिला.

अक्षर पटेल जखमी झाल्यानंतर शाहबाज अहमदला बदली खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले, परंतु त्याला मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

शाहबाज अहमदने भारतासाठी दोन टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात तेवढ्याच विकेट्स घेतल्या आहेत. 2023 मध्ये त्याचे टी-20 पदार्पण झाले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतामा टीम इंडियाने 20 षटकांत 231 धावा केल्या. शुबमन गिलच्या दुखापतीमुळे अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करणाऱ्या संजू सॅमसनने 22 चेंडूत 37 धावा केल्या, तर अभिषेकने 21 चेंडूत 34 धावा करून उत्कृष्ट साथ दिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माने 72 धावांची शानदार खेळी केली. तिलकसोबत हार्दिक पांड्याने टीम इंडियाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने फक्त 16 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि 25 चेंडूत 63 धावांची धमाकेदार खेळी केली. हार्दिकने या डावात पाच चौकार आणि पाच उत्तुंग षटकार मारले. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा निराशा केली, त्याने सात चेंडूत फक्त पाच धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत फक्त 201 धावा करता आल्या आणि भारताने 30 धावांनी सामना जिंकला.

Comments are closed.