IND vs SA: ऑस्ट्रेलियाचा विक्रम इतिहासजमा! भारताने मालिका जिंकताच रचला नवा अध्याय

भारतीय संघाने पाचव्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत मालिका 3-1ने जिंकली. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या स्फोटक अर्धशतकांमुळे भारताने 231 धावांचा डोंगर रचला. आफ्रिकन संघाला फक्त 201 धावाच करता आल्या. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गेल्या काही काळापासून असाधारण कामगिरी करत आहे. आता त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकून खास साध्य केले आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा घरच्या मैदानावर सलग नववा द्विपक्षीय मालिका विजय आहे. 2022 ते 2025 पर्यंत भारताने या सर्व मालिका जिंकल्या आणि ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाने 2006 ते 2010 पर्यंत घरच्या मैदानावर टी-20 क्रिकेटमध्ये सलग आठ द्विपक्षीय मालिका जिंकल्या. 2019 ते 2022 पर्यंत घरच्या मैदानावर सात द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकून भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय संघासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने डावाची सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी त्यांच्या 63 धावांच्या भागीदारीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या तिलक वर्माने 73 धावांचे योगदान दिले. नंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या हार्दिक पांड्याने स्फोटक फलंदाजी केली. त्याने 25 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 63 धावा केल्या.

यानंतर, दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी क्विंटन डी कॉकने 65 धावा केल्या, परंतु उर्वरित फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आणि संघ 201 धावा करू शकला. वरुण चक्रवर्तीने चार षटकांत 53 धावा देत चार बळी घेतले. जसप्रीत बुमराहनेही उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने चार षटकांत 17 धावा देत दोन बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Comments are closed.