अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार, भिवंडीतून महिला आणल्या; भाजपचा शिवसेना शिंदे गटावर आरोप
अंबरनाथ नगर परिषद निवडणूक 2025: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून राज्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. अशातf आणि अंबरनाथच्या (Ambernath Nagarparishad Election 2025) कोहोजगाव परिसरातुन एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मतदानासाठी शेकडो महिलांची एका सभागृहात गर्दी जमली असून हे मतदार बोगस (Bogus Voters in Ambernath) असल्याचा राजकीय पक्षांni दोष केलाय. या प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून इथलं वातावरण आता तापलं आहे.
Ambernath Nagarparishad Election 2025: काँग्रेस व भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले, वातावरण तापलं
अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते. हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणघ्या असल्याचा आरोप काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान काँग्रेस व भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातला, या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढले. या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का? याची चौकशी आता केली जाते आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं आहे.
Bogus Voters in Ambernath : मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन जणांना पकडलं
अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये दोन जणांना पैशाची पॉकिट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलंहे. त्यानंतर या दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलंहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.