ईशान किशन, शुभमन गिल OUT…; टी-20 वर्ल्डकपच्या Squad मध्ये ट्विस्ट?, आज BCCI करणार टीम इंडियाच
टीम इंडियाचा संघ T20 विश्वचषक 2026: 7 फेब्रुवारी 2025 पासून टी-20 विश्वचषक 2026 चा थरार (T20 World Cup 2026) रंगणार असून 8 मार्च 2026 पर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. भारत आणि श्रीलंका यंदाच्या टी-20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2026) 30 दिवसांत 55 सामने खेळवण्यात येणार असून 20 संघ निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, आज टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा होणार आहे. आज दुपारी 1.30 वाजता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडक अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाची घोषणा करणार आहे. (Team India Squad T20 World Cup 2026)
टीम इंडियाचा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या खराब फॉर्ममुळे चिंता निर्माण झाली आहे. मात्र सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममध्ये असला तरी किमान 2026 च्या टी-20 विश्वचषकापर्यंत तो कर्णधारपदी कायम राहू शकतो. मात्र ईशान किशनने (Ishan Kishan) सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेत केलेल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या स्पर्धेत ईशान किशनने 197 च्या स्ट्राईक रेटने 33 षटकारांसह 517 धावा ठोकल्या. तसेच ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडनं पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं आहे. टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या घोषणेआधी केलेल्या ईशान किशनच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या संघ निवडीत ट्विस्ट पाहायला मिळू शकतो.
शुभमन गिल, ऋषभ पंत रिंकू सिंग बचाव – (शुभमन गिल ऋषभ पंत)
खराब फॉर्ममुळे शुभमन गिलला टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळले जाऊ शकते. 2026 च्या टी२० विश्वचषकात ऋषभ पंत खेळण्याची शक्यता कमी आहे, कारण टीम इंडियाकडे जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे दोन यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांनाही संघात स्थान मिळेल. यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंग यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. तथापि, त्यांना राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ : (Team India Squad T20 World Cup 2026)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.
आणखी वाचा
Comments are closed.