‘सात समंदर पार…’ हायकोर्टात! रिमिक्स गाण्याला मनाई करा, चित्रपट निर्मात्याची मागणी
‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी’ या प्रसिद्ध गाण्याचे रिमिक्स आमची परवानगी न घेता करण्यात आले आहे, असा आरोप करणारी याचिका ‘विश्वात्मा’ चित्रपटाचे निर्माते त्रिमूर्ती फिल्म्स् यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दहा कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि या गाण्याचा रिमिक्स व अन्य कोणत्याही प्रकारे वापर करण्यास मनाई करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने प्रतिवादी धर्मा प्रोडक्शनला नोटीस जारी केली. यावरील पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या प्रोडक्शनचा ‘तू मेरा मै तेरा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विश्वात्माचे प्रसिद्ध गाणे रिमिक्स करून वापरण्यात आले आहे. यावर या याचिकेत तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.
सर्व अधिकार आमच्याकडे
या गाण्याचे सर्व अधिकार आमच्याकडे आहेत. आमची परवानगी न घेताच या गाण्याचे रिमिक्स करण्यात आले. धर्मा प्रॉडक्शनच्या नवीन चित्रपटाची जाहिरात सोशल मीडियावर सुरू आहे. त्यात या गाण्याचे रिमिक्स केल्याचे निदर्शनास आले, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
Comments are closed.