बॉक्स ऑफिस कलेक्शन: ‘धुरंधर’समोर ‘अवतार: फायर अँड अॅश’ची काय अवस्था? जाणून घ्या इतर चित्रपटांची कमाई – Tezzbuzz
सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंह अभिनित ‘धुरंधर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन आठवडे पूर्ण होऊनही चित्रपटाची कमाई स्थिर असून, दरम्यान जेम्स कॅमरूनचा बहुप्रतीक्षित ‘अवतार: फायर एंड ऐश’’ हा चित्रपटही शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. तसेच ‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ आणि ‘किस किसको प्यार करूं 2’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या कसोटीवर उतरले आहेत. जाणून घेऊया सर्व चित्रपटांची शुक्रवारची कमाई..
अवतार: (Avatar)फायर एंड ऐश -जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार’ मालिकेतील तिसरा भाग, अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने एकूण 20.05 कोटी रुपये कमावले आहेत. भाषानुसार कमाई अशी आहे— इंग्रजी: 9 कोटी रुपये, हिंदी: 5.5 कोटी रुपये, तमिळ: 2.60 कोटी रुपये, तेलुगू: 2.85 कोटी रुपये, कन्नड: 8 लाख रुपये, मल्याळम: 2 लाख रुपये कमावले आहेत.
धुरंधर – रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर दोन आठवडे पूर्ण करूनही तग धरून आहे. दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी, म्हणजेच 15व्या दिवशी, चित्रपटाने 22.50 कोटी रुपये कमावले. यासह चित्रपटाची एकूण कमाई 483 कोटी रुपये झाली असून आता 500 कोटींच्या क्लबकडे चित्रपटाची वाटचाल सुरू आहे.
दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी – संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांचा कॉमेडी-सॅटायर चित्रपट ‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र ‘धुरंधर’च्या जोरदार प्रभावामुळे या चित्रपटाला मर्यादित शो मिळाले. परिणामी पहिल्याच दिवशी चित्रपटाला केवळ 6 लाख रुपयांची कमाई करता आली आहे. पुढील दिवसांत चित्रपटाची कामगिरी कशी राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
किस किसको प्यार करूं 2 -कपिल शर्मा अभिनित ‘किस किसको प्यार करूं 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील गती मंदावली आहे. आठव्या दिवशी शुक्रवारी चित्रपटाने फक्त 22 लाख रुपये कमावले. आतापर्यंत चित्रपटाची एकूण कमाई 11.07 कोटी रुपये इतकीच झाली आहे. एकंदरीत, नव्या चित्रपटांच्या रिलीज असूनही ‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवरची पकड कायम असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अभिनेत्री शर्वरी वाघ हिचा हॉट आणि सिझलिंग लुक; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
Comments are closed.