Natural Hair Conditioner: केसांच्या वाढीसाठी बनवा नैसर्गिक कंडिशनर; मुळांना मिळेल पोषण

आजकाल व्यस्त जीवनशैली, बाहेरील धूळ आणि प्रदूषणामुळं केसांच्या समस्या वाढतात. केसांची निगा राखणं कठीण जातं. परिणामी केस कोरडे, निस्तेज दिसतात. खरं तर केसांची वरवर काळजी घेऊन उपयोग होत नाही. त्यांना मुळापर्यंत पोषण मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही काही घरगुती नैसर्गिक कंडिशनर तयार करू शकता. घरी सहज उपलब्ध असलेले घटक वापरून हे कंडिशनर तयार होतात. ( Natural And Homemade Hair Conditioner )

केळ
केळ हे केसांसाठी एक नैसर्गिक मॉइश्चरायझिंग एजंट आहे. कोरड्या केसांसाठी केळ अत्यंत फायदेशीर ठरतं. पिकलेले केळ मॅश करून त्यात मध, एक अंड फेटून घ्या आणि दूध मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर शॅम्पूने केस धुवा. केळात व्हिटॅमिन बी६, पोटॅशियम, प्रथिने आणि इतर पोषक तत्वे भरपूर असतात. यामुळं तुमच्या टाळू आणि केसांना खोलवर पोषण मिळते.

दही
दह्यात प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिड असते, दह्यामुळं केस मऊ होतात. दही, केळ, मध आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून मिश्रण तयार करा. ते तुमच्या केसांना लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर केस स्वच्छ धुवा. केस मऊ आणि चमकदार बनतात.

हेही वाचा: Hair Wash : खूप दिवस केस धुतलेच नाही तर काय होईल?

कोरफड
कोरफड हे केसांसाठी एक नैसर्गिक अमृतासारखं असतं, कारण ते पीएच संतुलन राखण्यास फायदेशीर असतं आणि केसांची वाढ उत्तेजित करते. एका भांड्यात फक्त चार चमचे कोरफड आणि थोडासा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून दोनदा ही प्रक्रिया केल्यास केस मऊ आणि दाट होतात.

Comments are closed.