मोदींच्या हेलिकॉप्टरला दाट धुक्याचा फटका बसला.

वृत्तसंस्था/ कोलकाता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमधील नादिया जिह्याचा दौरा शनिवारी दाट धुक्यामुळे विस्कळीत झाला. दृश्यमानता कमी असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर ताहेरपूर हेलिपॅडवर उतरू शकले नाही. हवेमध्ये काही वेळ घिरट्या घातल्यानंतर ते पुन्हा कोलकाता विमानतळावर परतले. खराब हवामानामुळे उड्डाण रद्द करावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या काळात प्रशासन आणि सुरक्षा संस्था सतत हवामानावर लक्ष ठेवून होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:40 वाजता कोलकात्यात पोहोचले. कोलकात्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या नादिया जिह्यातील ताहेरपूर येथे एका रॅलीला उपस्थित राहणार होते. दरम्यान, ताहेरपूर हेलिपॅडजवळ मोठ्या संख्येने लोक पंतप्रधानांची वाट पाहत उभे असल्याचे दिसून आले. व्हिडिओंमध्ये कार्यक्रमस्थळाभोवती आधीच उपस्थित असलेल्या समर्थकांची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली.

Comments are closed.