'शांतता' विधेयकावर काँग्रेसची टीका.

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे समाधान करण्यासाठी अणुऊर्जा निर्मिती संबंधातले ‘शांती’ विधेयक संसदेत घाईगडबड करुन संमत करुन घेतले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते जयराम रमेश यांनी केली आहे. हे विधेयक संमत झाल्यामुळे भारताचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्र खासगी उद्योगांना मोकळे झाले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मोठ्या कंपन्यांही आता भारतात अणुऊर्जानिर्मिती केंद्रे स्थापन करु शकणार आहेत. तसेच भारत मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडून अणुभट्ट्या विकत घेऊ शकणार आहे. येत्या 10 वर्षांमध्ये आपल्या अणुऊर्जा उत्पादनात 10 पट वाढ करुन ते 100 गीगावॅटस् किंवा 1 लाख मेगावॅट करण्याची भारताची योजना आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी या विधेयकाची खूप आवश्यकता होती. तथापि, काँग्रेसच्या म्हणण्यानुसार हे विधेयक भारताने अमेरिकेला राजी राखण्यासाठी आणले आहे.

Comments are closed.