कामगारांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची विशेष सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडली. आगामी कामगार भरतीमध्ये कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरीत सामावून करून घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाच्या खासगीकरणास युनियनचा विरोध असून लवकरच याविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाबा कदम यांनी दिला.
सभेमध्ये 2024 चा जमाखर्च ताळेबंद अहवालास सर्वानुमते मंजुरी दिली तसेच 2026 करिता संघटनेच्या नवनियुक्ती कार्यकारिणी सदस्य नियुक्तीचा तसेच संघटनेच्या स्वमालकीच्या कार्यालय खरेदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सरचिटणीस सत्यवान जावकर यांनी आरोग्य खात्यातील पंत्राटी ठेकेदार कामगारांवर करीत असलेल्या अन्यायकारक, बेकायदेशीर कृत्याबाबत केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. या प्रश्नावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सांवत यांच्या मध्यस्थीने आयुक्त यांच्यासमवेतील बैठकीतून कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल यांनी परिचारिका संवर्गाच्या 8 ऑफबाबत सविस्तर माहिती व न्यायालयीन प्रक्रियेतील कार्यवाहीची माहिती दिली.
यावेळी ‘निर्भीड म्युनिसिपल 45’ या पत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. संजय कांबळे-बापेरकर, हेमंत कदम, संजय वाघ, संदीप तांबे, अजय राऊत, वृषाली परुळेकर, महेश गुरव, अतुल केरकर, रामचंद्र लिंबारे, मंगल तावडे, शिल्पा पोवार, रंजना नेवाळकर उपस्थित होते.
सुसज्ज कामगार रुग्णालयासाठी पाठपुरावा
कामगार वृंदाच्या मेडिक्लेम प्रक्रियेत प्रशासन एकतर्फीपणे करीत असलेले बदल व मेडिक्लेमध्ये केलेले वर्गीकरण याबाबत बाबा कदम यांनी नाराजी व्यक्त करत केंद्र शासनाच्या धर्तीवर आपल्यासाठी स्वतंत्र, सुसज्ज, अद्ययावत कामगार रुग्णालय असलेच पाहिजे व त्याकरीता संघटना पाठपुरावा करेल, असे सांगितले.
Comments are closed.