माझ्याच पक्षाने माझी शक्ती हिरावून घेतली, पराभवानंतर मुनगंटीवार यांनी भाजपला सुनावले

सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर चांगलीच नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने वडेट्टीवार यांना बळ दिले आणि माझ्या पक्षाने माझी शक्ती हिरावून घेतली, असे गंभीर विधान करीत त्यांनी एक प्रकारे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

पक्षाने गटबाजीला पोषक वातावरण तयार केले. शनि शिंगणापूरनंतर आमचा एकमेव पक्ष असे आहे, जिथे दरवाजे सतत उघडे असतात, असे म्हणत पक्षात बाहेरून येणाऱ्यांवर आणि या धोरणावरही जोरदार प्रहार केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील अकरापैकी बहुतांश नगरपरिषदा भाजपच्या हातून निसटल्या यावर दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपूर- गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यातून कुणालाही मंत्री केले नाही यावर त्यांनी कटाक्ष केला. काँग्रेसचे नवे लोकप्रतिनिधी लोकांच्या मूलभूत सुविधांचे समाधान करणार असतील म्हणून त्यांना हे यश मिळाले असा टोला लगावत ,आम्ही आत्मचिंतन करू असेही मुनगंटीवार म्हणाले.

Comments are closed.