बापट ढालवर स्पोर्ट्स फिल्डची पकड

स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनचा सहा विकेट आणि तीन षटके राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित टी-20 67 व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने दिलेले 133 धावांचे आव्हान स्पोर्ट्स फिल्डने 17 षटकांत 134 धावा करत पार केले.

प्रथम फलंदाजी करताना युनायटेडच्या प्रतीक गोतसुर्वेची 45 धावांची खेळी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या डावात शुभम पाठकने 4, केतन जोशी आणि रोहिल जाधवने प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना झिशान चौधरीने नाबाद 31, यश पैने 31 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. भाविक पटेलने 2 बळी मिळवले.

पारितोषिक वितरणप्रसंगी युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनचे कार्यवाह संगम लाड यांना 18 व्या जी. एस. वैद्य स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव  उन्मेष खानविलकर, नदीम मेमन, संदीप विचारे, प्रमोद यादव, निल सावंत, यजमान संस्थेचे अध्यक्ष
डॉ.नासीर दवे, कार्यवाह दाऊद खान आदी उपस्थित राहिले असते.

Comments are closed.