भाजपच्या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचा खोटा प्रचार रोखा; आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन, कांजूर मार्ग आणि गिरगावात शिवसेनेचे दणदणीत मेळावे
‘निवडणूक जाहीर होताच व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवर भाजपने खोटा प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेची कामे ते स्वतःच्या नावावर खपवत आहेत. अशा वेळी खरी परिस्थिती आणि शिवसेनेचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सज्ज व्हा. डिजिटल माध्यमांवरचा भाजपचा खोटा प्रचार पुसून काढा. त्यांना तिथल्या तिथे उत्तर द्या,’ असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज गिरगाव व कांजूरमार्ग येथे निर्धार मेळावे घेतले. निवडणुकीच्या प्रचारात नेमके काय करायला हवे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजप व मिंधे गटावर तोफ डागली. ‘मुंबईसाठी आपण जे केले आहे ते अभिमानाने सांगा. भाजपकडे सांगण्यासाठी काही नसल्याने ते तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही एखाद्या विकासकामाबद्दल सांगितले तर ते मुंबईत रोहिंग्या आणि बांगलादेशी कसे घुसलेले आहेत त्याबद्दल सांगतील. त्यांना तिथेच उत्तर द्या,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
…मग आमच्यासोबत का राहिलात?
‘मुंबईसाठी शिवसेनेने काय केले असे आता भाजपवाले विचारत आहेत. आम्ही 25 वर्षे काही केले नसेल तर तुम्ही 25 वर्षे आमच्या सोबत का होता? आणि केलं असेल तर आम्हाला शिव्या का देता आणि प्रश्न का विचारता,’ असा बिनतोड सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
कांजूरमार्ग येथील मेळाव्याला आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, बाबा कदम, राजोल पाटील, शाखाप्रमुख रवींद्र महाडिक, महिला शाखा संघटक श्वेता पावसकर हे उपस्थित होते. तर गिरगाव येथील मेळाव्याला शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक धात्रक, अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, युगंधरा साळेकर उपस्थित होते.
400 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
यावेळी भांडुप कोकण नगर येथील उत्साही मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, तसेच पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
आपला उमेदवार मशाल
‘ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. इच्छुक अनेक आहेत, पण उद्धवसाहेब जो उमेदवार देतील त्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपला उमेदवार मशाल आहे. ही मशाल घरोघरी घेऊन जायची आहे. जो अंधार मुंबईत केला जातोय, तो दूर करण्यासाठी मुंबई आपल्या हातून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि दुष्ट प्रवृत्तीला जाळण्यासाठी मशाल हाती घ्यायची आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी माणसात फूट पडणाऱ्यांना जागा दाखवा – संजय राऊत
’मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची भीती भाजपच्या अमित शहांना वाटते. या भीतीतूनच भाजपने शिवसेना पक्ष पह्डला. आता या अमित शहांचा मुंबईवर डोळा आहे. त्यांना मुंबई गुजरातला जोडायची आहे, मात्र जोपर्यंत आपण सगळे आहोत, ठाकरे आहेत, तोपर्यंत भाजपला मुंबई तोडता येणार नाही, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यावेळी ठणकावून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्र 25 वर्षे झुंज देत राहिला. औरंग्याला इथेच गाडले तो महाराष्ट्र मोदी आणि अमित शहांना शरण कसा जाईल, असा सवाल करतानाच, ’मराठी माणसात फूट पडणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा,’ असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
हे लक्षात ठेवा…
n प्रत्येक दिवसाचे नियोजन करा.
n मशाल किती लोकांपर्यंत पोहोचवणार हे ठरवा!
n एकही घर, एकही इमारत संपका&विना सोडू नका!
n शाखा-शाखांमध्ये अंतिम मतदार यादीचे वाचन करा!
Comments are closed.