काँग्रेस नेत्याच्या पत्नीवर विदेशी निधीचा आरोप
पवन खेडांच्या पत्नी नीलिमा कोटा संतप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांच्या पत्नी आणि प्रख्यात लेखिका कोटा नीलिमा यांच्यावर विदेशी फंडिंग आणि मीडिया नेटवर्कवरील प्रभावाच्या गैरवापराचा आरोप होतोय. कोटा नीलिमा यांनी स्वत:वरील सर्व आरोप फेटाळत त्यांना मानहानी करणारे ठरविले आहे. अशाप्रकारचे आरोप करणाऱ्या लोकांच्या विरोधात खटला दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेस पक्ष, विदेशी फंडिंग आणि मीडिया नेटवर्क यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या पूर्ण इकोसिस्टीमच्या मध्यस्थानी कोटा नीलिमा असल्याचा आरोप काही जणांकडून केला जातोय.कोटा नीलिमा या दिल्लीतील एक संघटना ‘प्रोटो’ शी संबंधित असल्याचा दावा हातेय. ही संघटना अमेरिकेशी संबंधित जर्नलिझम प्रोग्राम्सद्वारे कुठल्या भारतीय पत्रकारांना विदेशी फंडिंग दिले जावे याचा निर्णय घेत असते.
प्रोटोची स्थापना 2018 साली अमेरिकेतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्सशी (आयसीएफजे) संबंधित फेलोजकडुन करण्यात आली होती. त्यानंतर प्रोटो दक्षिण आशियात आयसीएफजेच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख भागीदार झाल्याचा दावा आहे. आयसीएफजेला पाश्चिमात्य सरकार, फौंडेशन्स आणि मीडिया संस्थांकडून विदेशी फंडिंग मिळते, ज्याला भारतात पत्रकारिकता कार्यक्रमांद्वारे चालविले जाते. या पुढाकारांच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात कथित स्वरुपात नॅरेटिव्ह तयार केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अनेक माध्यमांशी संबंधाचा दावा
कोटा नीलिमा या 2017 नंतर अनेक प्रसारमाध्यमे आणि सिव्हिल सोसायटी प्लॅटफॉर्म्सशी निगडित राहिल्या किंवा त्यांनी ते सुरू केले होते. यात इन्स्टीट्यूट अॅफ परसेप्शन स्टडीज, रेट द डिबेट, हक्कू इनिशिएटिव्ह आणि स्टुडिओअ•ा यासारखी नावे सामील असल्याचा दावा आहे. या प्लॅटफॉर्म्सवर भाजप सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना प्रामुख्याने स्थना देण्यात आले आणि विदेशी फंडिंगयुक्त पत्रकारिकता प्रकल्पांसाठी निवडीला प्रभावित करण्यात आल्याचा आरोप आहे.
आरोप फेटाळला
माझ्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आले असून ते सर्व खोटे आहेत. अशाप्रकारचे आरोप करणाऱ्या लोकांच्या विरोधात मी मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा दावा कोटा नीलिमा यांनी केला आहे.
Comments are closed.