पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, न
भारत विरुद्ध पाक U19 आशिया कप 2025 फायनल: अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final) पराभव करत जेतेपद पटकावले. 2025 च्या 19 वर्षांखालील आशिया कपच्या (U19 Asia Cup 2025) अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा संघ फक्त 156 धावांवर आटोपला.
अंतिम सामन्यात भारताचा पराभव होताच पाकिस्तानकडून जंगी सेलिब्रेशन (Pakistan Celebration) करण्यात आले. पाकिस्तानचे खेळाडू विजयानंतर टीम इंडियातील खेळाडूंना डिवचत होते. परंतु टीम इंडियातील खेळाडूंनीही त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. तसेच भारतात सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटाच्या गाण्यावरही पाकिस्तानच्या खेळाडूंनी ठेका धरला. धुरंधरमधील बहरीनचं रॅप ट्रॅक FA9LA वर पाकिस्तानच्या खेळाडूंनी डान्स केला. यादरम्यानचे व्हिडीओही देखील आशियाई क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final)
भारताचा 191 धावांनी पराभव, सामना कसा राहिला? (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final)
अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा संघ फक्त 156 धावांवर आटोपला. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासह अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. कर्णधार आयुष म्हात्रे फक्त दोन धावा करू शकला. तर संघातील सहा भारतीय खेळाडू धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या दीपेश देवेंद्रनने 16 चेंडूत 36 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून अली रझा याने 42 धावांत 4 विकेट्स पटकावल्या. मोहम्मद सय्यम, अब्दुल सुभान आणि हुजैफा एहसान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने दिलेल्या 348 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने तिसऱ्याच षटकांत 32 धावांवर पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे सात चेंडूत दोन धावा करून बाद झाला.त्यानंतर आरोन जॉर्ज नऊ चेंडूत 16 धावा करून बाद झाला. यापाठोपाठ वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 26 धावा करून बाद झाला, ज्यामध्ये एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भारताच्या एकाही आघाडीच्या फलंदाजाने सातत्यपूर्ण फलंदाजी केली नाही. जलद धावांचा पाठलाग करताना सर्व बाद झाले. वेदांत त्रिवेदी 14 चेंडूत 9, अभिज्ञान कुंडू 20 चेंडूत 13, कनिष्क चौहान 23 चेंडूत 9 आणि खिलन पटेल 23 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. हेनिल पटेलनंतर दीपेश देवेंद्रनने 36 धावा केल्या.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.