ना कुठला राजकीय वारसा, ना खिशात पैसा, लोकवर्गणीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढला अन् दणदणीत विजय
यवतमाळ नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक निकाल 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निकालाचे (नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक निकाल 2025) चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचाच गाजावाजा असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणूक या कार्यकर्त्यांच्या निवडणूक असल्याचं म्हटलं जात असलं तरी नगरपालिकांच्या पूर्वी झालेली हि निवडणूक एक प्रकारे सेमीफायनल म्हणूनच बघितल्या गेल्याचं चित्र होतं. त्यासाठी अनेक पक्षातील बड्यानेत्यांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चेबांधणी केल्याचे बघायला मिळालं तर निकालानंतर अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेलाही धक्का लागल्याचे बघायला मिळालं. एकंदरीत राज्याच्या राजकारणाची हि सगळी बाजू असताना विदर्भातील यवतमाळमधून एक अतिशय दिलासादायक आणि राजकारण येऊ पाहणाऱ्यासाठी आशादायक अशी बातमी समोर आली आहे.
यवतमाळ News : शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात विजय
पाठीशी कुठलंहे मोठं राजकीय पाठबळ नसताना, कुठलाही पार्टी सोबत नसतांनाही आणि विशिष्ट म्हणजे आर्थिक बाजूहे समर्थ नसताना एका तरुण उमेदवारानाही लोकशाहीच्या या उत्सावात आपलं नशीब प्रयत्न करालं अन् लोकराजानं त्यांच्या पारड्यात भरभरून मतदान करत त्या uमेदवाराला विजयहे मिळवून दिलाय. सचिन उर्फ जांभा कैलास कराळे असं या उमेदवाराचं नाव आहे. यवतमाळच्या नेरमध्ये (Ner) आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात हा विजय संपादन केला आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची, राहायला हक्काचं घरही नाही, लोक वर्गणीतून निवडणूक अन् विजय
सचिन उर्फ जांभा कैलास कराळे यांच्या पाठीशी कुठलंही राजकीय पाठबळ नसतानाहे जनतेच्या आणि आपल्या कार्याच्या जोरावर निवडणुकीचा आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना जनतेचीहे सह लाभली अन् लोक वर्गणीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी एकहाती विजय खेचून आणला आहे. विशिष्ट म्हणजे स्वतःची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची, राहायला स्वतःचे हक्काचं घरही नाही. अशा परिस्थितीतहे जांभाने आपली महत्वाकांक्षा सोडली नाही. परिणामी यवतमाळच्या नेर गावाच्या जनतेनेहे पारंपरिक समीकरणांना पायदळी तुडवत लोकशाहीची ताकद दाखवून दिली आणि सचिन उर्फ जांभा कैलास कराळे यांच्यावर विश्वास दर्शवत विजय मिळवून दिलाहे.
Yavatmal Municipal Council Election Result 2025: यवतमाळ नगराध्यक्षपदी भाजपचे ऍड. प्रियदर्शनी उईके विजयी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची कन्या ही यवतमाळ नगर परिषदेत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका मोघे यांच्यावर दणदणीत विजय मिळविला. हा माझा एकट्याचा विजय नसून संपूर्ण यवतमाळकरांचा विजय असल्याची भावना यावी त्यांनी व्यक्त केली. प्रियदर्शनी विकी यांनी 57 713 मते घेतली तर काँग्रेसची प्रियंका मोघे यांनी 44994 मते पडली यामध्ये प्रियदर्शनी विकी या 12719 मतांनी विजयी झाल्या.
1) नेर नगरपरिषद शिवसेना शिंदे गट सुनीता जयस्वाल नगराध्यक्षपदी 5163 मतांनी विजयी
2).घाटंजी नागरपरिषद नगराध्यक्ष पदी काँग्रेसचे परेश कारिया 4955 मतांनी विजयी
3) दारव्हा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुनील चिरडे विजयी*
4) पांढरकवडा नगरपरिषद भाजपचे आतिष बोरले नगराध्यक्षपदी 213 मतांनी विजयी
5) पुसद नगरपरिषद राष्ट्रवादी कॉग्रेस (अप) ऍड.मोहिनी नाईक विजयी
6) ढाणकी नगर पंचायत शिव UBT – विजयी
आणखी वाचा
Comments are closed.