Latur : सत्ताधारी भिडले, सत्ताधारीच जिंकले; लातूर जिल्ह्यातील निकालांनी राजकीय समीकरणं बदलली
Latur Nagarparishad Nagarpanchayat Election Results 2025 : लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायत निवडणुकीत एक गोष्ट ठळकपणे समोर आलीहे. यात सत्ताधारी आपापसात भिडले, पण सत्ता फक्त सत्ताधाऱ्यांकडेच राहिलीहे. या लढतीत पारंपरिक विरोधक काँग्रेस मात्र प्रभावी ठरू शकली नाही आणि याचे थेट पडसाद आता येणाऱ्या लातूर महानगरपालिका निवडणुकीवर उमटणार आहेत. लातूर जिल्ह्यातील (Latur District Nagar Parishad Election 2025 Results) निकालांनी राजकीय समीकरणं बदललीहे. ती नेमकी कशी? हे जाणून घेऊ. (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025)
Election Result 2025 : निकालांनी राजकीय समीकरणं बदलली, महानगरपालिका निवडणुकीवर थेट परिणाम?
विजयानंतर निलंगामध्ये भाजप कार्यकर्त्यात प्रचंड जल्लोष दिसून आला. उदगीर अहमदपूर आणि रेणापुरातील भाजपच विनर ठरली. निलंग्यात भाजप–काँग्रेस थेट लढतीत भाजपाने सरशी साधली. रेणापूरमध्येही भाजपाने काँग्रेसवर मात करत नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवलं. तर अहमदपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अटीतटीचा सामना झाला, मात्र सत्ता विभागली गेली. औशामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने बहुमतासह नगराध्यक्ष पद पटकावलं, उरुळीची जागा भाजप आणि शिंदे शिवसेनेनाही ताब्यात घेतल्या तर काँग्रेस इथे पूर्णपणे अपयशी ठरली. उदगीरमध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीने 40 पैकी 33 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली.
Latur District Election 2025 Results : सत्ताधाऱ्यांकडून नियोजनबद्ध ताकद, काँग्रेसमुक्त लातूर करण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा निर्धार
या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांकडून नियोजनबद्ध ताकद मैदानात उतरली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार संजय बनसोडे हे सगळेच नेते सक्रिय होते. त्याउलट काँग्रेसचा लढा आमदार अमित देशमुख यांच्या एकट्याच्या खांद्यावर सीमित राहिल्याचं चित्र दिसलं. या विजयाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी आता थेट लातूर महानगरपालिकेला आव्हान दिलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन लातूर जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. सत्ताधाऱ्यांची दिशा ठरलेली आहे, तयारी स्पष्ट आहे. तर आता प्रश्न इतकाच की, महानगरपालिकेत काँग्रेस प्रतिकार उभा करू शकणार का? का येथेही पुन्हा सत्ताधारीचे एकमेकांच्या विरोधात उभे थाकातिल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
लातूर
विभाग – मराठवाडा
जिल्हा – लातूर
एकूण नगर परिषद – ०४
एकूण नगर पंचायत – ०१
नगर परिषद – औसा
एकूण जागा – २३
नगरसेवक कल/निकाल
भाजप – ०६
शिंदेंची शिवसेना –
अजित पवार राष्ट्रवादी – १७
काँग्रेस –
ठाकरेंची शिवसेना –
शरद पवार राष्ट्रवादी –
इतर –
———-
नगर परिषद – उदगीर
एकूण जागा – ४०
नगरसेवक कल/निकाल
भाजप – १३
शिंदेंची शिवसेना –
अजित पवार राष्ट्रवादी – 20
काँग्रेस – ०५
ठाकरेंची शिवसेना –
शरद पवार राष्ट्रवादी –
इतर – ०२
———-
नगर परिषद – निलंगा
एकूण जागा – २३
नगरसेवक कल/निकाल
भाजप – १५
शिंदेंची शिवसेना –
अजित पवार राष्ट्रवादी –
काँग्रेस – ०८
ठाकरेंची शिवसेना –
शरद पवार राष्ट्रवादी –
इतर –
———-
नगर परिषद – अहमदपूर
एकूण जागा – २५
नगरसेवक कल/निकाल
भाजप – ०३
शिंदेंची शिवसेना –
अजित पवार राष्ट्रवादी – १६
काँग्रेस –
ठाकरेंची शिवसेना – ०३
शरद पवार राष्ट्रवादी – ०३
इतर –
———-
नगर पंचायत – रेणापूर
एकूण जागा – १७
नगरसेवक कल/निकाल
भाजप – १०
शिंदेंची शिवसेना –
अजित पवार राष्ट्रवादी –
काँग्रेस – ०५
ठाकरेंची शिवसेना –
शरद पवार राष्ट्रवादी – 01
इतर – ०१
———-
जिल्हा – लातूर
जिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – ०५
भाजप – ०४
शिंदेंची शिवसेना –
अजित पवार राष्ट्रवादी – 01
काँग्रेस –
ठाकरेंची शिवसेना –
शरद पवार राष्ट्रवादी –
इतर –
——–
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.