पक्षाच्या, नेत्याच्या अन् कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता ती वेळी आली; नगरपरिषदेच्या
Nitesh Rane Nagarparishad Result 2025: राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) काल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीत कोकणातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची मुसंडी मारली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर विजयी, तर भाजपाला फक्त 5 जागांवर विजय मिळवला. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा 11, शिवसेना शिंदे गटाला 7, काँग्रेसला 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झाला. कणकवलीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला 9 तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. महत्वाचे म्हणजे भाजपाचे 9 उमेदवार विजयी झाले असले तरी कणकवली नगपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 145 मतांनी विजयी झाले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांच्यावर वरचढ ठरले. (Nilesh Rane vs Nitesh Rane)
नगरपरिषदेच्या निकालानंतर आता नितेश राणे यांच्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. गप्प होतो…पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी..पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे, असं ट्विट मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणेंच्या या पोस्टमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच मालवण आणि सावंतवाडीमधील निकालावरुन नितेश राणेंनी हे विधान केल्याची चर्चांही सध्या रंगली आहे. (Nitesh Rane Nagarparishad Result 2025)
गप्प होतो ..
पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी..
पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात..
पण आता ती वेळ आली आहे !— Nitesh Rane (@NiteshNRane) 22 डिसेंबर 2025
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा- (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025)
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीत (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) भाजपाचाच वरचष्मा पहायला मिळतोय. 288 पैकी 117 जागांवर भाजपाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आलेत. यामध्ये 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेत. फक्त नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यांत भाजपची पाटी कोरी राहिली आहे. भाजपापाठोपाठ शिंदेंची शिवसेना निकालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगराध्यक्ष निवडून आलेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 37 उमेदवार नगराध्यपदी विजयी झालेत. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला मोठा धोबीपछाड मिळालाय. मविआतील तिन्ही पक्षांना मिळून 50 चा आकडाही पार करता आलेला नाही. तिन्ही पक्षांचा मिळून फक्त 44 जागांवर विजय झालाय. त्यामध्ये काँग्रेसला 28, ठाकरेसेनेला 9 तर पवारांचे 7 उमेदवार नगराध्यपदी विजयी झालेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर
आणखी वाचा
Comments are closed.