ज्या दिवशी मी धमाका करने, त्या दिवशी…, खराब कामगिरवरून सूर्यकुमार यादवचं तडाखेबंद भाषण

चौफेर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारा टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव बऱ्याच दिवसांपासून खराब कामगिरीमुळे चर्चेत आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभुमीवर त्यांच फॉर्ममध्ये येणं संघासाठी गरजेचं आहे. त्याच्या खराब कामगिरीची बरीच चर्चा झाली. आता त्याने स्वत: यावर भाष्य केलं आहे. अहमदाबादच्या जीएलएस विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्याने संवाद साधला. यावेळी बोलताना त्याने आपल्या खराब कामगिरीवर मजेशीर पद्धतीने भाष्य केलं आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “एक खेळाडू नेहमीच चांगल्या फॉर्ममध्ये नसतो. मी असं नाही म्हणत की, आमचा वाईट काळ सुरू आहे. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. नेहमीच एक असा टप्पा येतो जेव्हा तुम्हाला वाटत की तुम्ही शिकत आहात. माझ्यासाठी हा एक शिकण्याचा टप्पा आहे. माझ्यासाठी सध्या इतर 14 खेळाडू मला कवर करण्याचं काम करत आहेत. त्यांना माहिती आहे, ज्या दिवशी मी धमाका करने, त्या दिवशी काय होईल. आणि मला खात्री आहे, तुम्हालाही याची कल्पना असेल.” सूर्यकुमार यादवने अगदी मजेशीर आणि सकारात्मक पद्धतीने आपल्या खराब कामगिरीवर भाष्य केलं.

सूर्यकुमार यादवच्या सकारात्मक वृत्तीमुळे उपस्थित विद्यार्थी सुद्धा मन लावून त्याचं बोलणं एकत होते. त्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचही उदाहरण दिलं. तो म्हणाली की, “जर तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळाले, तर तुम्ही शाळा सोडता का? नाही, तुम्ही पुन्हा चांगला अभ्यास करता आणि चांगले गुण मिळवता. मीही सध्या तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. मला आणखी चांगली कामगिरी करत पुनरागमन करायचे आहे. ” असं म्हणत सूर्यकुमार यादवने दमदार पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.

सूर्यकुमार यादवची कामगिरी या वर्षामध्ये निराशाजनक राहिली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. 19 डावांमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याने या 19 डावांमध्ये फक्त 218 धावा केल्या. आशिया चषकामध्येही त्याची बॅट तळपली नाही. आशिया चषकामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 47 होती. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. परंतू आता आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्याकडून संघासह देशाला भरपूर अपेक्षा आहेत.

Comments are closed.