मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेता- दिग्दर्शक रणजित पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निरोप

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेतचा रणजीत पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणजित पाटील याच्या या अकस्मात निधनाचा मराठी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

रणजित पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडिल असा परिवार आहे. रणजित पाटील यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

रंगभूमीवर गाजलेल्या जर तर या प्रिया बापट व उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या नाटकाचे दिग्दर्शन रणजित पाटील यांनी केले होते. तसेच काळे धंदे या वेबसिरीजमध्ये त्यांनी अभिनयही केला होता.

घरी आला हृदयविकाराचा झटका

रणजित पाटील यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

Comments are closed.