किंग कोहली आणि हिटमॅनची जोडी मैदानात उतरण्यासाठी सज्ज! पाहा मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यांचं वेळापत्रक

भारतीय संघाचे सुपरस्टार विराट कोहली ( Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा आता ‘विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये रोहित शर्मा मुंबई क्रिकेट संघाकडून खेळेल, तर विराट कोहली दिल्ली संघाचा भाग असेल.

24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरतील. या दोन्ही संघांचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी चाहते आता खूप उत्सुक आहेत. ‘रो-को’ (रोहित-कोहली) जोडी पुढच्या वर्षी भारतीय संघासाठी पुन्हा एकत्र खेळताना दिसेल.

दिल्लीचा संघ आपला पहिला सामना 24 डिसेंबरला आंध्र प्रदेशविरुद्ध खेळणार आहे, जिथे ‘किंग कोहली’ मैदानात दिसेल. त्यानंतर कोहली आपला दुसरा सामना 26 डिसेंबरला गुजरातविरुद्ध बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळेल. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना किमान 2 सामने खेळणे बंधनकारक केले असल्याने, या दोन सामन्यानंतर कोहली कदाचित विश्रांती घेईल.

रोहित शर्मा 24 डिसेंबरला सिक्कीमविरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्यानंतर तो 26 डिसेंबरला उत्तराखंडविरुद्ध आपला दुसरा सामना खेळताना दिसेल.

Comments are closed.