ईशान आणि वॉशिंग्टनच्या निवडीवर माजी खेळाडू नाराज! टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीम इंडियावर केले प्रश्न उपस्थित
टी-20 विश्वचषक 2026 साठी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात ईशान किशनचे (Ishan kishan) पुनरागमन झाले असून, उपकर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आणि जितेश शर्मा (Jitesh Sharma) यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे. या निवडीनंतर माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Vasim jafar) यांनी संघावर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
जाफर यांच्या मते, ईशान किशन आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्या ऐवजी यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आणि जितेश शर्मा यांना संघात स्थान मिळायला हवे होते.
टी-20 विश्वचषकाचे आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. शनिवार, 20 डिसेंबर रोजी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया आणि सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. त्यानंतर रविवारी वसीम जाफर यांनी ट्विट करत विचारले, जयस्वाल आणि जितेश का नाहीत?
आपले म्हणणे स्पष्ट करताना वसीम जाफर यांनी पुढे लिहिले, मी ईशान किशन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी जितेश आणि यशस्वीला खेळवले असते. अक्षर पटेल उपकर्णधार असल्याने त्याचे खेळणे निश्चित आहे, पण तुम्ही वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्या आधी वॉशिंग्टन सुंदरला संधी देऊ शकत नाही. जितेशने असे काहीही चुकीचे केलेले नाही की त्याला संघातून डच्चू मिळावा, आणि यशस्वी जयस्वाल का हवा? हे सांगण्याची गरजच नाही.
Comments are closed.