Latur News अहमदपूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या
शहरात पूर्ववैमनस्यातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकू आणि काठीने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर चार फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
फिर्यादी उमेर खाजामौनोदीन बागवान आणि मयत शोएब इसाक बागवान (वय २६ वर्ष, रा. बागवान गल्ली) हे रविवारी (दि. २१) रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास अबुबकर किराणा दुकानाच्या बाजूला बोलत थांबले होते. यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून सहा आरोपींनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी उमेर आणि शोएब यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे शोएब बागवान याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी खालील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमीर खलील शेख, कलीम खलील शेख, गणीबी शेख, मालन बबलू शेख (सर्व रा. अहमदपूर) या सहा आरोपींपैकी दोन आरोपी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची सविस्तर माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत अहमदपूरमध्ये थांबून घटनास्थळाची पाहणी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले, आनंद श्रीमंगल, स्मिता जाधव व कर्मचारी हनुमंत आरदवाड, तानाजी आरदवाड, बबन चपडे, चालक केंद्रे , राहुल कांबळे, भोपळे, पद्माकर पांचाळ, सतीष चव्हाण होमगार्ड जावेद आदी सह तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे करत आहेत.
Comments are closed.