महापालिका हिंमतीने लढेल व जिंकेल, संपर्कप्रमुख बबनराव थोरातांचा विश्वास

पक्ष फुटीनंतर शिवसैनिकांनी मेहनत करुन लोकांना साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामान्य माणसे शिवसेनेसोबत जोडली गेली असून, त्याचाच प्रत्यय या निवडणुकीत आला असून, या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक नगराध्यक्ष, 14 नगरसेवक व चार शिवसेना पुरस्कृत अशा एकूण १८ जागेवर विजय मिळविला असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सोमवार दि. 22 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस लातूरचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, महानगरप्रमुख प्रकाश मारावा, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, धोंडू पाटील आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 20 प्रभाग, 81 सदस्य यासाठी जवळपास 150 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतीवेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार अनुसया खेडकर, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख बबन बारसे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. नगरपंचायत, नगरपरिषद निवडणूकांप्रमाणेच शिवसेना मनपा निवडणुकीतही हिमतीने लढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार असताना याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वात जास्त जागा मिळविल्या. तर शिंदे गटाचे चार आमदार असताना त्यांना फक्त दोन नगराध्यक्ष आणि १५ सदस्य निवडून आणता आले. उलटपक्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक नगराध्यक्ष, 14 नगरसेवक व चार पुरस्कृत असे एकूण 18 जागांवर विजय मिळविला. तर शिंदे गटाला केवळ 15 जागेवर विजय मिळविता आला.

Comments are closed.