विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विराट-रोहितसह 'हे' स्टार खेळाडू मैदानात उतरणार! शुबमन गिलच्या नावाचाही समावेश

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चा हंगाम 24 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांसारखे दिग्गज खेळाडू ॲक्शन मोडमध्ये दिसतील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण 19 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्व संघांची घोषणा झाली असून अनेक मोठे खेळाडू यात खेळताना दिसणार आहेत.

या स्पर्धेत एकूण 38 संघ सहभागी झाले असून त्यांच्यात 135 सामने रंगणार आहेत. ए, बी, सी आणि डी या प्रत्येक ग्रुपमध्ये 8-8 संघ आहेत, तर प्लेट ग्रुपमध्ये 6 संघ आहेत. दिल्लीचा संघ ‘ग्रुप डी’ मध्ये, तर मुंबईचा संघ ‘ग्रुप सी’ मध्ये आहे. आधी साखळी फेरी (Round Robin) आणि त्यानंतर बाद फेरी (Knockout) होईल.

18 जानेवारी रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. विराट आणि रोहित केवळ 2 सामने खेळणार आहेत. विराट कोहली तब्बल 15 वर्षांनंतर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे (शेवटचा सामना 2010 मध्ये). तर रोहित शर्मा 7 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. रोहित सरावासाठी जयपूरला पोहोचला आहे, कारण मुंबईचे सामने तिथे होणार आहेत. रिपोर्टनुसार, हे दोन्ही दिग्गज खेळाडू आपापल्या संघांसाठी फक्त सुरुवातीचे दोन सामने खेळतील. त्यानंतर ते 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सामील होतील.

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या संघातून वगळण्यात आलेला शुबमन गिल (Shubman gill) फॉर्म मिळवण्यासाठी पंजाबच्या संघातून खेळणार आहे. जर पंजाबचा संघ पुढच्या फेरीत पोहोचला, तरीही गिलला खेळता येणार नाही, कारण तोदेखील न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग असेल.

या स्पर्धेत अनेक मोठे खेळाडू आपले कौशल्य दाखवणार आहेत:
पंजाब : अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग.
मुंबई : सरफराज खान, शार्दुल ठाकूर.
बडोदा: हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जितेश शर्मा.
बंगाल : मोहम्मद शमी, आकाश दीप.
आंध्र : नितीशकुमार रेड्डी, के.एस. भरत.
राजस्थान : राहुल चहर, खलील अहमद.
बिहार : वैभव सूर्यवंशी.

Comments are closed.