Switchboard Cleaning Hacks: मळकट स्विचबोर्ड 5 मिनिटांत करा स्वच्छ; महागडे क्लिनर नव्हे करा हे सोपे उपाय
घरात प्रसन्न वातावरणासाठी नियमित स्वच्छता करणं गरजेचं आहे. अनेकदा घरातील स्विचबोर्ड हे अतिशय मळकट झालेले असतात. त्यावर धुळीमुळे चिकटपणा असतो. त्यांना थेट पाण्याने धुणं शक्य नसतं. अशा वेळी महागडी उत्पादने, क्लिनर वापरावी लागतात. पण जर तुमच्याकडे ते बाजारातील क्लिनर नसेल तर काही सोपे उपाय करून तुम्ही घरातील स्विचबोर्ड अगदी ५ मिनिटात स्वच्छ करू शकता. ( Simple And Easy Swichboard Cleaning Hacks )
नेलपेंट रिमूव्हर
स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नेलपेंट रिमूव्हर वापरू शकता. कारण त्यातील रसायने चिकट डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यासाठी नेलपेंट रिमूव्हरमध्ये एखादं कापड बुडवा आणि नंतर बोर्ड स्वच्छ करा. यामुळे स्विचबोर्ड नव्यासारखा दिसेल.
व्हिनेगर आणि लिंबाचा रस
कठीण डाग काढण्यासाठी व्हिनेगर आणि लिंबाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतात. स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हे घटक वापरू शकता. त्यासाठी २ चमचे व्हिनेगर आणि १ चमचा लिंबाचा रस पाण्यात मिसळा. या मिश्रणाने स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी कापसाचा गोळा किंवा टूथब्रश वापरा. यामुळे कितीही हट्टी डाग सहजपणे निघून जातील आणि स्विचबोर्ड स्वच्छ होईल.
शेव्हिंग क्रीम
स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी शेव्हिंग क्रीम देखील खूप उपयुक्त आहे. स्विचबोर्डवर शेव्हिंग क्रीम लावून १० ते १५ मिनिटे तसंच सोडा. नंतर स्वच्छ कापड वापरा आणि ते पुसून टाका. यामुळे स्विचबोर्डवरील धूळ, घाण निघून जाते.
टूथपेस्ट
टूथपेस्ट स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यासाठी जुन्या टूथब्रशला टूथपेस्ट लावा आणि ते स्विचबोर्डवर घासा. नंतर एखाद्या ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. यामुळे काही मिनिटांत तुमचा स्विचबोर्ड नव्यासारखा दिसेल.
हे लक्षात ठेवा:
स्विचबोर्ड स्वच्छ करण्यापूर्वी, मुख्य वीजपुरवठा बंद करा, अन्यथा तुम्हाला विजेचा झटका बसू शकतो.
Comments are closed.