Leather Jacket Cleaning Hacks: लेदर जॅकेट कसं स्वच्छ करावं? वॉशिंग मशीनमध्ये धुण्याची चूक टाळा
थंडीत आपण उबदारपणासाठी लेदरचं जॅकेट घालतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लेदर जॅकेटला सर्वांचीच पसंती असते. पण बाहेरच्या धुळीमुळं ते मळकट दिसतं. अशावेळी ते स्वच्छ कसं करावं हा प्रश्न पडतो. खरं तर, लेदर जॅकेटची स्वच्छता करताना काळजी घेणं गरजेचं असतं. कारण एखाद्या चुकीमुळे त्याची गुणवत्ता लवकर खराब होते. त्यामुळं ते स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.. ( Leather Jacket Cleaning Hacks )
सौम्य डिटर्जंट
लेदर जॅकेट नेहमी ड्राय क्लीन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळं ते स्वच्छ करण्यासाठी साबणाच्या बारचा वापर पूर्णपणे टाळावा. यामुळे जॅकेट लवकर खराब होऊ शकते. ते अगदीच मळकट झालेलं असेल तर सौम्य डिटर्जंट किंवा लेदर डाग रिमूव्हर वापरणं चांगलं असतं.
कापड
जर तुम्हाला तुमच्या जॅकेटवर जास्त धुळ दिसत असेल तर ब्रश वापरणं टाळा. त्याऐवजी ते स्वच्छ करण्यासाठी मऊ कापड वापरा. यामुळे जॅकेट फाटणार नाही आणि ते स्वच्छ करणं देखील सोपं होईल.
डाग कसे काढायचे?
कधीकधी लेदर जॅकेटचा नियमित वापर केल्याने काही कठीण डाग त्यावर पडतात आणि हे डाग सहज निघत नाहीत. अशावेळी डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळा आणि त्यात मऊ कापड भिजवा. आता डाग असलेला भाग या ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. लक्षात ठेवा स्वच्छता करताना जास्त घासू नका कारण यामुळे जॅकेटची चमक कमी होऊ शकते.
वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका
बरेच लोक लेदर जॅकेट इतर कपड्यांसह वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. परंतु ही एक मोठी चूक असू शकते. यामुळे लेदरमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते, ज्यामुळे त्याची चमक कमी होते. म्हणून, तुम्ही घरीच स्पॉट क्लीनिंग केल्यास ते स्वच्छ होतं.
हेही लक्षात ठेवा:
जॅकेट स्वच्छ केल्यानंतर ते कडक होऊ नये म्हणून ‘लेदर कंडिशनर’ वापरा. यामुळे लेदरचा मऊपणा आणि नैसर्गिक चमक टिकून राहते.
लेदर जॅकेट दुमडून ठेवू नका. यामुळे त्यावर सुरकुत्या पडू शकतात. त्याऐवजी हॅन्गरवर ते टांगून ठेवा.
Comments are closed.