मी पूर्ण रात्र झोपलेच नाही; पहाटे साडेतीन वाजता उर्फी जावेदला काय झाले? पोलिस ठाण्यात सांगितली व्यथा – Tezzbuzz

लोकप्रिय टीव्ही आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या हटके फॅशनमुळे नाही, तर एका अत्यंत भयावह अनुभवामुळे. मध्यरात्री उर्फीच्या घराबाहेर दोन अनोळखी पुरुष उभे राहून सतत दाराची बेल वाजवत असल्याने ती प्रचंड घाबरली. या घटनेनंतर तिला पहाटेच पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली.

ही घटना २२ डिसेंबरच्या रात्री घडली. उर्फी जावेदच्या (Urfi Javed)सांगण्यानुसार, पहाटे सुमारे ३.३० वाजता तिच्या घराची बेल सतत वाजू लागली. सुरुवातीला तिने चुकून कुणी वाजवत असावे असे समजून दुर्लक्ष केले, मात्र बेल थांबलीच नाही. काही वेळाने तिला कळले की घराबाहेर एक नाही तर दोन पुरुष उभे होते आणि ते जाण्यास तयार नव्हते. उर्फीने इंटरकॉम आणि दारामधून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि निघून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. उलट दार उघडण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती अधिकच भयावह बनली. एकटी राहणाऱ्या महिलेसाठी हा अनुभव किती धक्कादायक असू शकतो, हे उर्फीने शब्दांत व्यक्त केले.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच उर्फी जावेदने पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही त्या दोघांचा आक्रमक आणि असभ्य पवित्रा कायम राहिला. उर्फीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले. नंतर समोर आले की हे दोन्ही पुरुष त्याच इमारतीत राहणारे होते. या संपूर्ण घटनेमुळे उर्फी पूर्णपणे हादरून गेली आहे. “पहाटे ३ वाजता एखाद्या महिलेच्या घराबाहेर उभे राहून दार उघडण्याचा हट्ट धरणे आणि नकार दिल्यानंतरही तिथेच थांबणे, हा अत्यंत भयावह अनुभव आहे,” असे तिने सांगितले. या घटनेनंतर तिला स्वतःची सुरक्षितता धोक्यात असल्याची तीव्र भावना असल्याचेही तिने स्पष्ट केले.

घाबरलेल्या अवस्थेत उर्फी पहाटे सुमारे ५ वाजता पोलिस ठाण्यात पोहोचली आणि औपचारिक तक्रार दाखल केली. तिने पोलिस ठाण्यातून स्वतःचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हा आपल्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव असल्याचे म्हटले आहे. आरोपींवर काय कारवाई होणार, याबाबतही तिने प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, उर्फीची बहीण डॉली जावेद हिनेही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले आहे. चाहते आणि अनेक सेलिब्रिटीही उर्फीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

चौफेर टीका झेलूनही बॉक्स ऑफिसवर दहाडणारा हा चित्रपट, आता दुसऱ्या भागाच्या हालचालीला सुरुवात

Comments are closed.