Year Ender 2025: इडली ते मोदक, यावर्षी सर्वाधिक सर्च झाले ‘हे’ पदार्थ; पाहा यादी

यंदा इंटरनेट युझर्सने गुगलवर अनेक रेसिपी सर्च केल्या. गुगलने आपला वार्षिक ‘इयर इन सर्च २०२५’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, लोकांनी केवळ स्वादिष्ट पदार्थच नव्हे तर आरोग्य आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या पदार्थांचाही शोध घेतला. चला तर मग सरत्या वर्षानिमित्त जाणून घेऊया २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेले पदार्थ कोणते होते? ( Year Ender 2025 food search trends )

इडली

आळशी

यावर्षी गुगलवर सर्वाधिक शोधली गेलेली रेसिपी म्हणजे इडली. दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत या पदार्थाला अमूल्य स्थान आहे. मात्र २०२५ मध्ये हा पदार्थ जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याचं कारण म्हणजे २०२५ मध्ये ‘हेल्थ कॉन्शियस’ जीवनशैलीमुळे लोकांनी वाफवलेल्या आणि आंबवलेल्या पदार्थांना पसंती दिली. इडली पचायला हलकी आणि प्रथिनांनी समृद्ध असल्याने ती अनेकांची पहिली पसंती ठरली आहे.

उकडीचे मोदक

उकडीचे फॅशन्स

उकडीचे मोदक हा प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण २०२५ मध्ये हा पदार्थ केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरताच मर्यादित राहिला नाही. कारण २०२५ मध्ये गणेश चतुर्थीच्या काळात उकडीचे मोदक हा पदार्थ सर्वाधिक ट्रेंडिंग राहिला. तांदळाची पिठी, ओलं खोबरं आणि गुळापासून तयार होणारा हा पदार्थ आरोग्यदायी आणि सात्विक मानला जातो. यंदा लोकांनी ‘चॉकलेट मोदक’ आणि ‘फ्यूजन मोदक’च्या रेसिपी मोठ्या प्रमाणात सर्च केल्या.

हेही वाचा: गोवा किंवा हिमाचल नव्हे; 2025 मध्ये ‘हे’ राज्य ठरलं पर्यटकांचं फेव्हरेट, 65 कोटी लोकांनी दिली भेट

थेकुआ

थेकुआ

बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजेच्या वेळी बनवला जाणारा थेकुआ हा पदार्थ यावर्षी गुगलच्या टॉप ५ सर्च यादीत होता. गव्हाचं पीठ, गूळ आणि तूपापासून बनवलेला हा पदार्थ असतो. छठ पूजेचे महत्त्व देशभरात वाढत असल्याने हा पदार्थ ट्रेंडिंग होता. तसेच जास्त दिवस टिकत असल्याने लोकांनी ट्रॅव्हल फूड म्हणून ही रेसिपी सर्च केली.

उगादी पचाडी

उगाडी पचडी

उगादी पचाडी हा दक्षिण भारतातील, विशेषतः आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उगादी सणाच्या दिवशी बनवला जाणारा एक पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ गोड, आंबट, तिखट, कडू आणि खारट अशा विविध चवींचा संगम असतो. यात कडुलिंब, गूळ, मिरची, मीठ, चिंच आणि कैरी अशा सहा चवींचे मिश्रण असते. हे आयुष्यातील सुख-दु:खाचे प्रतीक मानलं जातं. हा पदार्थही २०२५ मध्ये ट्रेंडिंग राहिला.

बीटरूट कांजी

बीटरूट कांजी

उत्तर भारतातील हे पेय यावर्षी ‘नॅचरल डिटॉक्स’ म्हणून लोकप्रिय ठरलं. हे बीट वापरून बनवलेले एक प्रोबायोटिक पेय आहे, जे गाजर, मोहरी पूड, मीठ आणि पाणी घालून आंबवून तयार केलं जातं. हे पचनासाठी उत्तम असतं आणि हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देतं. याच्या गडद लाल रंगाने इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा: Year Ender : 2025 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक सर्च केले हे आजार, वाचा संपूर्ण लिस्ट

Comments are closed.