Photo – मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी लगबग

छायाचित्र – रुपेश जाधव

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच आजपासून (23 डिसेंबर 2025) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

या पार्श्वभूमीवर दादर येथील डिसिल्वा शाळेमधील मध्यवर्ती निवडणूक केंद्रात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती.

निवडणूक कार्यालयात अर्ज घेण्यासाठी आणि आवश्यक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली.

निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याने राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.

येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उत्साह अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Comments are closed.