ICC टी-20 रँकिंगमध्ये दीप्ती शर्मा पहिल्यांदाच अव्वल! वनडेमध्ये स्मृती मंधानाची पहिल्या क्रमांकावरून घसरण
भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी (ICC) महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट पुन्हा एकदा एकदिवसीय (ODI) फलंदाजांच्या यादीत नंबर-1 वर पोहोचली आहे, तर भारताच्या स्मृती मंधानाची (Smriti Mandhna) एका स्थानाने घसरण झाली आहे.
विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दीप्तिने 4 षटकांत केवळ 20 धावा देत 1 विकेट घेतली. तिच्या या किफायतशीर गोलंदाजीमुळे तिला 5 रेटिंग पॉइंट्स मिळाले. यामुळे तिने ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला मागे टाकत अव्वल स्थान गाठले. सध्या दीप्ती एका पॉइंटच्या फरकाने आघाडीवर आहे. याच सामन्यातील कामगिरीमुळे भारताची अरुंधती रेड्डी 5 स्थानांनी वर चढून 36 व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
श्रीलंकेविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावल्यामुळे जेमिमा (Jemimah Rodrigues) 5 स्थानांच्या प्रगतीसह 9 व्या क्रमांकावर आली आहे. तिला या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला. सध्या टी-20 क्रमवारीत स्मृती मंधाना (तिसऱ्या क्रमांकावर), जेमिमा रॉड्रिग्स (9 व्या क्रमांकावर) आणि शफाली वर्मा (10 व्या क्रमांकावर) अशा तीन भारतीय खेळाडू टॉप 10 मध्ये आहेत.
स्मृती मंधानाची वनडे फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग दोन शतके झळकावत दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड्टने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पॉइंट्स मिळवत मंधानाला मागे टाकले.
वनडे फलंदाजीमध्ये 34 व्या क्रमांकावर, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 22 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. मालिका गमावली असली तरी आयर्लंडच्या आर्लेन केली (गोलंदाजी – 27 वे स्थान), गॅबी लुईस (18 वे स्थान) आणि एमी हंटर (28 वे स्थान) यांनी आपापल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.
Comments are closed.