ही कामगिरी करणारा स्टार्क जगातील पहिलाच गोलंदाज! वकार युनिसचा 30 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उद्ध्वस्त
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) सध्या ॲशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या कामगिरीदरम्यान स्टार्कने जागतिक क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या वर्षात 50 हून अधिक कसोटी विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. सध्या त्याच्या नावावर 51 विकेट्स आहेत. या शर्यतीत भारताचा मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) 43 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पर्थ कसोटीत 7 विकेट्स आणि ब्रिस्बेन कसोटीत 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात (एका वर्षात) 50 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्कचा ‘स्ट्राईक रेट’ 2025 मध्ये 27.8 एवढा होता. वकार युनिसचा जुना रेकॉर्ड मध्ये त्यांचा स्ट्राईक रेट’ 29.5 1993 मध्ये सर्वात सर्वोत्तम ठरला होता.
जॉर्ज लोहमन (इंग्लंड) 1886 मध्ये त्यांचा स्ट्राईक रेट 18 होता, पण त्यांनी त्या वर्षी 50 विकेट्स पूर्ण केल्या नव्हत्या. त्यामुळे 50 विकेट्स घेणाऱ्यांमध्ये स्टार्क आता जगात नंबर-1 आहे. 2024 मध्ये बुमराह (Jasprit Bumrah) या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता. त्याने 71 विकेट्स घेतल्या होत्या, पण त्याचा स्ट्राईक रेट 30.1 होता, जो वकार युनिसपेक्षा थोडा जास्त होता.
वर्षाचा शेवटचा ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ अजून बाकी आहे. त्यामुळे मिचेल स्टार्कला आपल्या विकेट्सची संख्या आणि हा विक्रम अजून भक्कम करण्याची संधी आहे.
Comments are closed.