पाकिस्तानला IMF चा दणका, दिवाळखोरीत निघालेली राष्ट्रीय विमान कंपनी विकण्याची नामुष्की

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स: पाकिस्तान देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी (पीआयए) दीर्घकाळ चाललेल्या तोट्यामुळे विकली गेली. आरिफ हबीब ग्रुपने पीआयएला 135 अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या सर्वाधिक बोलीने खरेदी केले. लकी सिमेंटने 101.5 अब्ज रुपयांची बोली लावली होती. एअरब्लूने 26.5  अब्ज रुपयांची बोली लावली होती. पण अखेर हबीब ग्रुपने पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी खरेदी केली आहे. पीआयएने त्यांच्या 75 टक्के शेअर्ससाठी लिलाव सुरू केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या लिलावातून मिळालेल्या 92.5 टक्के रक्कम एअरलाइन सुधारण्यासाठी खर्च केली जाईल.

एअरलाइनच्या सुधारणांवर किती खर्च केला जाईल?

पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या लिलावातून मिळालेल्या एकूण रकमेपैकी 92.5 टक्के रक्कम एअरलाइनच्या सुधारणांवर खर्च केली जाईल. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार, पीआयएकडे सध्या 32 विमाने आहेत, ज्यात एअरबस ए 320, बोईंग 737, एअरबस ए 330  आणि बोईंग 777 सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. उड्डाणांचा अभाव, खराब व्यवस्थापन आणि मोठ्या कर्जामुळे पीआयएची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.

पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट

पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना, मंत्री जनतेला मूर्ख बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी लिलाव प्रक्रियेसाठी पंतप्रधानांचे सहाय्यक आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. ते म्हणाले, “आज आपण जिथे आहोत तिथे पोहोचण्यासाठी खूप वेळ आणि कठोर परिश्रम लागले. पीआयएसाठी बोली लावणारे सर्व पाकिस्तानचे आहेत.”

पीआयएच्या खाजगीकरणामुळे देशात गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग खुले होतील

औरंगजेब यांनी आशा व्यक्त केली की या लिलावामुळे स्थानिक गुंतवणूकदारांची संख्या वाढेल, ज्यामुळे देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांची संख्या देखील वाढेल. पीआयएच्या खाजगीकरणामुळे देशात गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग खुले होतील अशी आशा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराने व्यक्त केली. पीआयए खाजगीकरण समितीचे सल्लागार मुहम्मद अली यांनी सांगितले की सरकारचे उद्दिष्ट केवळ पीआयए विकणे नाही तर ते स्वावलंबी आणि मजबूत बनवणे आहे.

पीआयएचे खाजगीकरण हे आयएमएफच्या 7 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट कार्यक्रमाचा एक भाग

पीआयएचे खाजगीकरण हे आयएमएफच्या 7 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यासाठी पाकिस्तानला तोट्यात चालणाऱ्या सरकारी मालकीच्या कंपन्यांना विकणे किंवा पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. आयएमएफ पीआयएचे पूर्णपणे खाजगीकरण करू इच्छित होते जेणेकरून सरकार किंवा लष्कराचे त्यावर नियंत्रण राहणार नाही.

आणखी वाचा

Comments are closed.