अमेरिकेने केले 95 हजार व्हिसा रद्द, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा फटका

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चालू वर्षात आतापर्यंत तब्बल 95 हजार परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली असून हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
सध्या अमेरिकेत असलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसाची काटेकोर तपासणी केली जात आहे. या तपासणीअंती डिसेंबरच्या सुरुवातीला 85 हजार व्हिसा रद्द करण्यात आले होते.
अमेरिकेने व्हिसा रद्द करण्याचा धडाका लावलेला आहे त्याचा फटका विद्यार्थ्यांनाच बसतो आहे असे नाही, तर एच 1 बी व्हिसाधारक उच्चशिक्षित कुशल कर्मचाऱयांवरही टांगती तलवार आहे. याआधीच व्हिसा अर्जाचे शुल्क वाढवून अमेरिकेने परदेशी कर्मचाऱयांना दणका दिला आहेच, आता तपासणीत व्हिसा रद्द होण्याची भीती आहे.

Comments are closed.