INDW vs SLW: शफाली वर्माची विस्फोटक खेळी; दुसऱ्या टी20 मध्ये श्रीलंकेवर भारताचा एकतर्फी विजय

भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघांमधील टी-20 मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 128 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.5 षटकांत 3 विकेट्स गमावून 129 धावांचे लक्ष्य गाठले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. क्रांती गौडने पहिल्याच षटकात टीम इंडियाला ब्रेकथ्रू दिला. तिने एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या विश्मी गुणरत्नेला बाद केले. 38 धावांवर श्रीलंकेला दुसरा धक्का बसला. स्नेह राणाने कर्णधार चामारी अटापट्टूला बाद केले,तिने 24 चेंडूंत 31 धावा करत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. हसिनी परेरा आणि हर्षिता समरविक्रम यांनी शानदार भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. त्यानंतर चांगली फलंदाजी करणाऱ्या हर्षिता मडावी धावबाद झाल्या. हर्षिताने 32 चेंडूत 33 धावा केल्या आणि चार चौकार मारले. शेवटच्या षटकात संघाने तीन विकेट गमावल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. स्मृती मानधना आणि शफाली वर्माने डावाची सुरुवात केली. संघाला पहिला धक्का 29 धावांवर बसला, मानधना 11 चेंडूत 14 धावांवर बाद झाली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी झाली. जेमिमा 15 चेंडूत 26 धावांवर बाद झाली, तिने चार चौकार मारले. त्यानंतर शफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उर्वरित काम पूर्ण केले, शफाली वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आणि मॅच विनिंग खेळी केली. तिने 34 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. हरमनप्रीत कौरने 12 चेंडूत 10 धावा केल्या.

Comments are closed.