कारेगुट्टा हिल्समध्ये नक्षलवाद्यांचा दारूगोळा जप्त.

सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेत यश : जमिनीत गाडून ठेवला होता दारूगोळा

वृत्तसंस्था/ बिजापूर

छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोधमोहिमेदरम्यान कर्रेगुट्टा हिल्सच्या डोलीगुट्टा शिखर क्षेत्रात जवानांनी शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा हस्तगत केला आहे. या भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबविली होती. नक्षलवाद्यांनी जमिनीत ख•ा करत शस्त्रास्त्रांसह स्फोटके लपविली होती. नक्षलवाद्यांची शस्त्रास्त्रs, दुरुस्ती उपकरणे, बीजीएल सेल निर्माणसामग्री आणि स्फोटक सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. तसेच कर्रेगुट्टा हिल्सच्या डोलीगुट्टा शिखरावर नक्षलवाद्यांनी पेरलेले 2 प्रेशर आयईडी शोधून काढत ते 204 कोब्राच्या बीडीडी टीमकडून नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताडपाला खोरे क्षेत्राच्या जंगलांमध्ये जिल्हा सुरक्षा दल, कोब्रा 204 तसेच सीआरपीएफच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली होती. जवानांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs दुरुस्ती करण्याची उपकरणे, बीजीएल निर्माणाची सामग्री आणि  स्फोटक सामग्रीचा साठा शोधून काढला आहे.

हस्तगत सामग्रीत काय मिळाले?

-हँड फ्लाय प्रेस

-मोठ्या प्रमाणात बीजीएल सेल (मोठे, मध्यम अन् छोट्या आकाराचे)

-बीजीएल टेल, स्टील प्लेट आणि इतर पार्ट्स

-स्क्रू ड्रायवर, हॅक्सा ब्लेड, प्लायर इत्यादी उपकरणे

-शस्त्रास्त्रs दुरुस्तीची अन्य अवजड उपकरणे

नक्षलवाद्यांचा कट उधळला

सुरक्षा दलांची सतर्कता आणि त्वरित कारवाईमुळे नक्षलवाद्यांचा कट उधळला गेला आहे. दारूगोळा हस्तगत करण्याची कारवाई क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सुरक्षादलांची कार्यवाही सातत्याने जारी आहे. जवानांनी सोमवारी सुकमा जिल्ह्यात मोठी कारवाई केली होती. नक्षलवाद्यांचा रायफल फॅक्ट्रीचा भांडाफोड जवानांनी केला होता. यादरम्यान मोठ्या संख्येत रायफल्स आणि स्फोटकांसह नक्षली साहित्य हस्तगत करण्यात आले होते.

Comments are closed.