पेड न्यूज, वादग्रस्त प्रकरणांवर पालिकेचा ‘वॉच’! आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
आचारसंहिता काळात पेड न्यूज आणि वादग्रस्त प्रकरणांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत आणि योग्यरीत्या पार पडणे, राजकीय पक्ष, उमेदवारांना समान संधी मिळणे यासाठी पालिकेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूकविषयी इलेक्ट्रॉनिक मीडियात जाहिरातींची तपासणी, विविध प्रसारमाध्यमातील वृत्तांकनात आचारसंहितेचे पालन केले की नाही, सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
…तर कायदेशीर कारवाई
कोणताही पक्ष किंवा उमेदवाराकडून आचारसंहिता भंग करण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. तर निवडणुकीसंदर्भात काही पत्रव्यवहार असल्यास मुंबई महानगरपालिका मुख्यालय, विस्तारित इमारत, तळमजला, जनसंपर्क विभाग या ठिकाणी करण्यात यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
अशी आहे समिती
महापालिका आयुक्त – अध्यक्ष
पोलीस आयुक्त किंवा प्रतिनिधी – सदस्य
अतिरिक्त महापालिका
आयुक्त (शहर) – सदस्य
आचार संहिता कक्ष प्रमुख – सदस्य
जनसंपर्क अधिकारी – सदस्य सचिव
Comments are closed.